इंधनाच्या बाष्पीभवनामुळे होतंय नुकसान – लोध
रत्नागिरी:-कोरोनाला हरवण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र लाॅक डाऊन असला तरी राज्यातील पेट्रोल पंपावर पुरेसा इंधनसाठा आहे. राज्यात एकूण ५ हजार ९०० पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपावर पुरेसा इंधनसाठा असल्याची माहिती फामपेडा म्हणजेच फेडरेशन आँफ महाराष्ट्र पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
कोरोनाच्या लढाईत लाॅक डाऊनमुळे अनेक उद्योग अडचणीत आलेत. पेट्रोल पंप चालक सुद्धा यातून सुटलेले नाहीत. सध्या पेट्रोल आणि डिझेलची केवळ ५ ते १० टक्केच एवढीच विक्री होत आहे. त्यात साठा मुबलक आहे. जितके दिवस माल पडून राहिल तेवढं त्याचं बाष्पीभवन जास्त होतं. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांचे मोठं नुकसान होत आहे. तर हायरिस्क घेवून पेट्रोल पंपावरील कर्मचारी काम करतायत, मात्र शासन स्तरावर त्याची कुठेही नोंद घेतली जात नाहीय, ऑइल कंपन्यांनी फक्त बंद दरवाजातून आदेश काढला आहे की तुम्ही 24 तास काम करा, पण ते कसं करावं यासाठी तेल कंपन्यांनी आम्हाला कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे निदान आमचे जे कर्मचारी आहेत जे हायरिस्कवर काम करत आहेत, त्यांना शासन किंवा ऑइल कंपन्यांनी विमा संरक्षण द्यावं अशी मागणीही फामपेडाचे अध्यक्ष लोध यांनी केली आहे..