रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा दुसार वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळ्ये जिल्हयात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. असे असले तरी लॉकडाऊनच्या पुढील कालावधीत अधिक सतर्क राहण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात होम क्वारंटाईन खाली ठेवण्यात आलेल्यांचीसंख्या 927 इतकी आहे. संस्थात्मक क्वारंटाईन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात 14 जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्हयात एका गुन्ह्याच्या नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 35 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कारणाशिवाय शहरात फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई सुरु करण्यात आली असून कारवाई अंतर्गत आज 53 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.जिल्हयात एकूण 48 निवारा केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली असून त्यामध्ये 64 लोकांना भोजनाची सोय केलेली आहे. याशिवाय इतर अन्य 680 लोकांची भोजनाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.