हाथ जोडतो पण घराबाहेर पडू नका.

रत्नागिरी:- संचारबंदी.. वाहन बंदी…. आता दुचाकींवरही बंदी असतानाही रत्नागिरीकर अगदी छोटी छोटी कारण घेऊन घराबाहेर पडत आहेत. कुणी लाईट बिल कमी करायला, कुणी बँकेतून पैसे काढायला, कुणी बाजारात जायला मंगळवारी बाहेर पडले. अशाच एका महिलेला वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी हाथ जोडून कळकळीची विनंती केली. ताई बाहेर पडू नका.. स्वतःची काळजी घ्या अशी विनंती वजा सूचना यावेळी केली.
रत्नागितीतही लॉक डाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असे असताना देखील रत्नागिरीकर मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. अशांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनि शहरात अंतरा अंतरावर पोलीस यंत्रणा उभी केली आहे. विनाकारण दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दंडात्मक कारवाई करूनही विनाकारण बाहेर पडणाऱ्याची संख्या घटत नसल्याने अखेर मंगळवारी वाहतूक पोलिसांनी अनेक दुचाकी मधील हवा सोडून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत 60 ते 70 दुचाकींवर कारवाई करण्यात आली. नागरिक अत्यन्त छोटी छोटी कारण घेऊन घराबाहेर पडत असल्याने अखेर एका महिलेला वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी हाथ जोडून घरी थांबण्याची विनंति केली.
मंगळवारी रत्नागिरीत 60 ते 70 गाड्यांची हवा सोडण्यात आली. सोमवारी काही वेळ गाड्या लॉक करून ठेवण्यात आल्या होत्या. याचा परिणाम फारसा दिसून आला नाही मात्र वाटेल ती कारणे सांगून बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना आज चांगलीच अद्दल घडली, त्यामुळे निश्चितच या कारवाईचा चांगला परिणाम होणार आहे.