रत्नागिरीत शिवभोजन आपल्या दारी झोपडपट्टीतल्या गरिबांपर्यंत पोहचवलं जात आहे शिवभोजन.

रत्नागिरी:-कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी संपुर्ण देश लाॅक डाऊन आहे. पण या लाॅक डाऊनमुळे गरिब भरडला जात आहे. पण याच गरिबांसाठी सरकारची शिवभोजन थाळी त्यांच्या घरापर्यंत पोहचली आहे..
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या खाण्याचे हाल होत आहेत. दरम्यान आशा गरिबांसाठी त्यांच्या घरापर्यंत भोजन पोहचावं यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव योजना आखली. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत आता शिवभोजन आपल्या दारी अशी संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे शिवभोजनच्या थाळी थेट गरिबांपर्यत पोहचवल्या जात आहेत. त्यामुळे आज रत्नागिरी आठवडाबाजाराजवळ असलेल्या झोपडपट्टीत गरिबांना हि थाळी देण्यात येत आहे. शिवभोजनचा ठेका असलेल्या हॉटेल मंगलाच्या माध्यमातून जवळपास १२० शिवभोजन थाळी या झोपडपट्टीत जावून वाटण्यात आल्या.