जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम.

रत्नागिरी आर्मी संघटनेचं रक्तदान शिबिर

रत्नागिरी:-कोरोनाच संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. अशावेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य करण्यासाठी रत्नागिरी आर्मी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आज या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी आर्मी संघटना तयार झाली असून सुदृढ समाजासाठी हि आर्मी काम करते. याच भावनेतून आगामी काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन रत्नागिरी आर्मी ने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याही वेळी कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचेही पालन करण्यात आलं. या शिबिरामध्ये जे नियमित रक्तदान करतात आणि ज्यांना रक्तदान करून 3 महिने पुर्ण झाले आहेत असे पोलीस व अन्य काही लोकं सहभागी झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते या रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आलं