गणपतीमुळे मंदिराकडून ११ लाखाची मदत.

रत्नागिरी:-जगप्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 11 लाखाची मदत जमा केली आहे. कोकणातील मोठ्या मंदिरांपैकी एक असलेल्या गणपतीपुळेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रमाणेच अन्य संस्थांही पावले टाकतील अशी शक्यता आहे.
सध्या राज्यभरातच नव्हे तर देशात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांना मदतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन राज्यभरातील संस्था, देवस्थान, कंपन्या आर्थिक मदतीसाठी सरसावल्या आहेत. कोकणातील सर्वाधिक पर्यटकांची गर्दी असलेल्या गणपतीपुळे प्रशासनाने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्वरीत हे पैसे जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिर प्रशासनानाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी दिली. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. यापुर्वी पावसाळ्यात आलेल्या पुराच्यावेळी आर्थिक मदत दिली होती.