रत्नागिरी:-कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. 14 एप्रिल पर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांचे प्रचंड हाल झाले आहेत. हाताला काम नाही खाण्यासाठी पैसे नाहीत असे शेकडो कामगार सोमवारी दुपारी शहरातील के सी जैन नगर येथे एकत्र होते.
मोठ्या संख्येने एकत्र असलेल्या कामगारांची माहिती काही पत्रकारांनी शहर पोलिस निरीक्षक पी. आय. लाड यांना कळवली. पी. आय. लाड यांनी तात्काळ के. सी. जैन नगर येथे धाव घेतली. कामगारांकडे विचारपूस केल्या नंतर कामगार चार दिवसांपासून उपाशी असल्याचे कळताच श्री लाड यांनी या कामगारांच्या जेवणाची तात्काळ व्यवस्था केली. पोलीस निरीक्षक श्री लाड यांनी दाखवलेल्या सहानुभूतीने उपस्थित कामगारांचे डोळे देखील पाणावले.