रत्नागिरीतील पहिला कोरोना रुग्ण कोरोनामुक्त.

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील
शृंगारतळी येथे दुबईतून आलेला ५० वर्षीय व्यक्तीची कोरोना व्हायरस पासून सुटका झाली आहे. दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या चाचणीत हा रुग्ण कोरोना मुक्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रत्नागिरीतील शृंगारतळी येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शुंगारतळी परिसरात तीन किमीपर्यंतचा भाग आयसोलोटेट करण्यात आला होता. तर पाच किमी पर्यंत प्रवासाला बंदी घालण्यात आली होती. संबंधित रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांनंतर पुन्हा या रुग्णाची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळी संबंधित रुग्ण कोरोना मुक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन दिवसांनी या रुग्णाची तिसरी आणि अंतिम तपासणी करण्यात येईल.