संगमेश्वर:- कोरोना सारख्या विषाणू थैमान घातले असताना रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी असून मा.जिल्हाधिकारी यांच्या कडून १४४ चे जमावबंदीचे आदेश असतानाही विनाकारण मोटरसायकल घेवून फिरणार्या २१ जणांवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत ४००० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रत्नागिरी सह संगमेश्वर ला ही काम नसताना विनाकारण फिरणारे मोटरसायकल वाल्यांना आज सायंकाळी अचानक संगमेश्वर पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय.अनावश्यक काम नसताना फियणार्याची संख्या जर वाढत राहीली तर या पेक्षा जास्त कारवाई ही मोहीम सक्तीची केली जाईल.त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील लोकांनी कामा शिवाय फिरू नये.प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून पोलीस व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आहवान संगमेश्वर पोलिस निरीक्षक उदयजी झावरे यांनी केले आहे.