भय इथले संपत नाही…!

किशोर आपटे, मुंबई वार्तापत्र

‘रेल्वे क्रॉसिंग करू नका घरी कुणीतरी तुमची वाट पहत आहे’ असे ज्या देशात सुशिक्षीतांना ठळकपणे वाचता येईल असे फलक लावावे लागतात त्या देशात आपण राहतो! या देशाने १९४२ मध्ये जगभर साम्राज्य असलेल्या ब्रिटीशांना पळवून लावले, तर कोरोना विषाणुला हरवण्यासाठी आणि ‘चलेजाव’ म्हणताना आपण आपल्या सामान्यांची वज्रमूठ दाखवून त्याला नक्कीच पळवून लावू शकतो. होय तुमच्या शक्तीचा परिणाम अंशत: दिसू लागला आहे! या हल्ल्यातून देश वाचविण्यासाठी २१ मार्चला राज्यात पहिल्यांदा संचारबंदीला सुरूवात झाली, २२मार्चला आपण जनता कर्फ्यू देशभर केला. त्यानंतर २४ तारखेपासून त्यात २१ दिवसांची वाढ केली आहे. गेल्या सात दिवसांत आपल्या एकजुटीचा खूप मोठा परिणाम दिसू लागला आहे. पण थांबा, भय इथले अजून संपले नाही, अजून हिंमत दाखवली पाहीजे. संपूर्ण लॉकडाऊन करून देशावर झालेल्या जैविक हल्ल्यातून देश वाचविला पाहीजे असे नाही वाटत का तुम्हाला? मग घरात बसा आणि हे वाचा. अधिकृत आकडेवारी नुसार २१ मार्चला आपल्या देशात कोरोनाग्रस्त होते २८३ त्यात दुस-या दिवशी २ २तारखेला ३९.९२टक्के वाढ झाली आणि ते ३९६ झाले. त्यानंतर त्यात २३ तारखेला १८ टक्के वाढ झाली. आणिसंख्या झाली ४६८, २४ तारखेला पुन्हा वाढ झाली २३.४३ टक्के संख्या झाली ५६६, २५ तारखेला पुन्हा वाढ पण गती कमी झाली १३.९५ टक्के संख्या ६४५, २६मार्चला पुन्हा वाढले पण गती कमी होती ११.६२टक्के २७ मार्चला संख्या वाढली७२० गती स्थिरावली १२.३० टक्के आणि सातव्या दिवशी २७ मार्चला संख्या वाढली पण मित्रानो तुम्ही घरात थांबू लागलात परिणाम असा झाला बघा वाढ ५.३१ टक्के! टाळेबंदी २१ दिवस कडेकोट पाळा त्या जैविक हल्ल्याच्या एवढ्याश्या विषाणुला आपण पळवून लावूया नक्कीच! नाही म्हणजे नाही घरातून बाहेर जायचे नाही स्वत: समजवा, घरातल्यांना नातेवाईक आणि तुमच्या प्रियजनाना सांगा तुम्हाला ते हवे आहेत!

या संकटात सुदैवाने राज्यात एक संवेदनशिल माणूस मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. संयमी संयत बोलणारा वाचाळवीरपणा न करता आर्जवे बोलताना विनोदबुध्दीने मनावरचा ताण दूर करणारा प्रशासनाचा अनुभव नसला तरी माणुसकीचा वसा घेतलेला हा माणूस आहे आपले मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे! नोव्हेंबर २०१९ मध्ये जन्माला आलेल्या ठाकरे सरकारची पहिल्या दिवसापासून सत्वपरिक्षा सुरू आहे. गेली अनेक वर्ष ज्या कॉंग्रेस पक्षाना राजकीय वैरी समजून त्यांच्याशी दोन हात केले त्यांच्या सोबत बसून सरकार चालविण्याचा धाडसी राजकीय निर्णय उध्दव बाळासाहेब ठाकरे यानी घेतला. त्यावेळी सर्वानाच धक्का बसला होता. त्यानंतर धर्मनिरपेक्षता की हिंदुत्व अश्या कात्रीत पकडून या सरकारची आणि त्यांच्या प्रमुखांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात उध्दव ठाकरे यानी थेट आयोध्येला जावून राम दर्शन घडवले आणि आपल्या सरकारचा किमान समान कार्यक्रम काहीही असला तरी आपले हिंदुत्व हे राज्यात नाही तर ते राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजप समोर आपले आव्हान देशात आहे हे सांगून टाकले!
कोणत्याही प्रशासनाची काहीच माहिती नसलेला, आणि संयत स्वभावा माणूस असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ खुर्चीसाठी हे पद हट्टाने घेतले आहे असा व्यक्तिगत प्रचार मग सुरू झाला. सारी राजकीय महत्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची असेल तरी ठाकरे यांना प्रशासनातील धेंडाशी सामना कसा करता येईल अश्या शंका घेतल्या जावू लागल्या गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारची शेवटच्या दिवसापर्यत जी रडकथा होती ती काय होती तर ‘प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही’ तगडे मुख्यमंत्री सत त फिरणारे रात्रीचा दिवस करून झपाटलेले काम करत उच्चरवात बोलणारे, आक्रमकपणाने विरोधकांना अंगावर घेणारे म्हणून प्रतिमा असलेल्या फडणवीस यांच्या काळात प्रशासनात बसलेल्या अधिका-यांना झारीतील शुक्राचार्याची उपमा दिली जात होती. ध धाडीचे मुख्यमंत्री असले तरी प्रशासन हलत नाही असे सांगत अपयशाला कारणे दिली जात होती. पण कर्जमुक्तीचा एक मोठा निर्णय घेताना केवळएका आदेशावर २५ हजार कोटी रूपयांची शेतकरी कर्जमुक्ती १५ एप्रिल पर्यंत दोन टप्प्यात पूर्ण करण्याचा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आणि प्रशासन कसे चालवायचे याचा वस्तुपाठच दाखवून दिला होता. कोरोना विषाणुच्या धोक्याची चाहूल फेब्रुवारी महिन्यात या सरकारला लागली होती. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर होते. पुढील वर्षात महाविकास आघाडीचा सर्व घटकांना समतोल न्याय देण्याचा प्रयत्न करणारा अर्थसंकल्प सोपवून ठाकरे सरकारला प्रशासनात काय कळत की नाय म्हण णा-यांना चांगली चपराक बसेल असे उत्तर देण्यात हे सरकार यशस्वी झाले.
तो पर्यंत तिकडे केद्रात डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागता मध्ये दंग असलेल्या सरकारचे कोविड- १९ कडे दुर्लक्ष नाही म्हटले तरी झाले होते. दिल्लीत झालेल्या पराभवा नंतर तेथे झालेल्या दंगलीच्या राजकारणात महिनाभर घालविणा-या केंद्र सरकारच्या आधी कोरोनाच्या धोक्याचा अंदाज राज्य सरकारला आला होता हे वास्तव मंत्रालयातील उच्च पदस्थांशी चर्चा केल्यानंतर समजते. राज्य सरकार म्हणून जे काही करणे आवश्यक होते ते उपाय सरकारने सुरू केले होते. पण लॉकडाऊन करणे आणि ते सुध्दा परदेशी नागरीक आणि विदेशी संचार बंद करणे या गोष्टी राज्य सरकारच्या हाती नव्हत्या. आणि नको ते झाले आहे. वेळ निघून जाताना आपण विषाणुला घुसू दिल्यावर लॉकडाऊन सुरू केले. ते देखील नोटबंदीसारखे रात्री आठ वाजता ज्यावेळी लोकांना हालता चालता जाता येता येणार नाही. अश्या नियोजनशून्य पध्दतीने केलेल्या लॉक डाऊनचा परिणाम गर्दी कमी करण्याऐवजी वाढण्यात झाला. दिवसभर कष्ट करून जगणा-या देशातील ३० – ४० टक्के लोकांना जेंव्हा हे समजले तेंव्हा त्यानी शहरातून गावाकडे पळण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे बस बंद होत्या. मग सुरू झाले रस्त्यांवर त्यांचे हाल! सर्वसामान्य मध्यम वर्गीयांना जेंव्हा २१ दिवस घरात बंद रहायचे सांगितले तेंव्हा महिना अखेर होती त्यांच्या घरात दाणागोटा नव्हता त्यांनी बाजारात गर्दी केली. नियोजन शुन्य पध्दतीने बंद ची घोषणा केल्याने जो अपेक्षीत परिणाम व्हायला हवा त्याच्या नेमक्या उलट्या प्रतिक्रीया आल्या राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे अभियंता आहेत, नऊ वेळा राज्याचे नियोजन आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्प यापूर्वी सादर केला आहे, २६ / ११ नंतर च्या नाजुक स्थितीत त्यांनी गृहमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यानी या बंदच्या पध्दतीवर उघडपणे भाष्य केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सज्जन गृहस्थ असल्याने त्यानी संयम दाखविला आणि वेळ काळ ओळखून पंतप्रधान यांना दूरध्वनी केला. त्यानंतर पुन्हा थेट संवाद करत जनतेला शांत करण्याचा प्रयत्न केला. लोकांना त्यांची रोग प्रतिकारक शक्ति टिकवा असे सांगताना त्यांना किमान दोनदा पोटभर अन्न द्यावे लागणार. विषाणुचा सामना करताना जास्तीत जास्त विटामीन क चे सेवन करा सांगताना फळे भाजीपाला दूध यांचा पुरवठा करावा लागणार केवळ आठ वाजता येवून हात जोडून घोषणा केल्याने जबाबदारी संपत नाही, हे जाणणारा मुख्यमंत्री या संकटामध्ये या राज्याला मिळाला होता हे दु:खाला चंदेरी किनार म्हणतात तसे सत्य होते. या राज्याला छत्रपतींच्या प्रशासनिक कौशल्याचा वारसा आहे. रयतेच्या शेतात पातीला हात लावू नका सांगणा-या राजाचा धाक होता. तेथे लोकांना नाईट लाइफचे स्वप्न दाखविणा-या सरकारला फाईट फॉर लाईफच्या स्थितीत राज्य सांभाळण्याचे कर्मकठीण काम करायचे आहे. केंद्राकडून मागच्या लाडक्या सरकारला जसे झुकते माप मिळाले तसे तर मिळण्याची मागण्याची स्थिती नसताना स्वत:च्तया हिमतीवर जनतेला सांभाळायची वेळ आली आहे. केवळ बाहेर पडू नका सांगायचे पण घरात बसून काय खायचे हे देखील सांगायला हवे याची जाण असलेल्या संवेदनशील व्यक्तीच्या हातात महाराष्ट्राची जनता संकटात सुध्दा सुखरूप आहे हे दिसू लागले आहे. जिवनावश्यक बाजार चोवीस तास सुरू राहतील, अडकून पडलेल्यांना शिवभोजनाच्या योजनेतून पुढील स्थिती सामान्य होईपर्यत जेवण मिळेल याची चिंता करणारे सरकार राज्यात आहे. केवळ एका एसएसएस वर शेतक-याची आडवलेली भाजीची गाडी सोडा सांगणारा दक्ष मुख्यमंत्री या राज्याला मिळाला आहे. हे सारे करताना मी केले असे म्हणत नाही संयमी शांतपणाने आर्जवाने बोलतो. ही सारी संकटात देखील सुखावून टाकणारी गोष्ट म्हणायला हवी आणि साथ द्यायला हवी महाराष्ट्राच्या सरकारला या देशाला कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी असे नाही का वाटत तुम्हाला? कवी ग्रेस यांच्या या ओळी या संदर्भात लक्षात ठेवा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली गिते’!
पूर्ण