गाडीवर प्रेसचा बोर्ड लावून त्या मुंबईतून पोहचल्या रत्नागिरीत.

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या रहीवाशी असलेल्या पाचजणी मुंबईत नोकरीसाठी राहत होत्या. कोरोनामुळे त्यांना नोकरी किंवा कामच नसल्यामुळे त्यांना परतीचे वेध लागले होते. मुंबईत चारचाकी गाडीने त्या रत्नागिरीत निघाल्या. गाडी कुणी अडवू नये यासाठी गाडीवर प्रेस चा बोर्ड लावला. परंतू त्यांचा बनाव रत्नागिरीत उघड झाला. रत्नागिरीत ताब्यात घेऊन या पाच जणींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांनी आपल्या गावचे वेध लागले आहेत. मुंबईतही हीच परिस्थिती असल्याने पाच जणींनी रत्नागिरी गाठण्यासाठी प्रवास सुरु केला. बंदी असल्यामुळे त्यांनी चारचाकी गाडीवर प्रेस लिहून रत्नागिरीकडे येण्यास निघाल्या. रत्नागिरीत शहरात प्रवेश करण्यापुर्वी हातखंबा येथे त्यांची चौकशी झाली. त्यात त्यांचा बनाव उघडकीस आला. सतर्क असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे आयकार्ड मागितले. मात्र ते देऊ शकले नाहीत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.