मासेमारी व्यवसायातीळ ८०० कोटींची उलाढाल ठप्प

कोरोनाचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला

रत्नागिरी:- कोरोनामुळे आता अनेक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येते. अनेक उद्योगधंद्यांना देखील याचा फटका बसलाय. पोल्ट्री व्यवसाया नंतर आता मच्छीमारी व्यवसायाची देखील परिस्थिती समोर आलीय. लॉकडाउनमुळे सध्या बोटी देखील समुद्रात नांगर टाकून उभ्याच आहेत. त्यामुळे आता मच्छिमार बेहाल झाले असून त्यांना आपल्या खिशातून खलाशांना पैसे द्यावे लागत आहेत. लॉकडाउनमुळे जवळपास 800 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

मासेमारी ठप्प असलयामुळे आता मालक देखील पुरते बेहाल झाले आहेत. मासे मिळत नसल्याने आधीच मच्छिमार बांधव संकटात आहेत. त्यात आता कोरोनामुळे नव्या संकटाला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालावे आणि तोडगा काढावा अशी मागणी देखील केली जात आहे.