संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे रुग्णवाहिका प्रमुख आझीम फकीर यांनी दिले भोजन.

रत्नागिरी:- संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी एनजीओ या संस्थेचे रुग्णवाहिका प्रमुख आझीम फकीर यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भोजन देण्यात आले.शहरात भोजनाची कोणत्याही प्रकारची सोय होत नसल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना उपाशी रहावे लागत होते.मात्र शहरातील अन्य अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे व दररोज अशा संस्था हे कार्य करीत आहे.याचाच एक भाग म्हणून संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांच्या वतीने भोजन देण्यात आले.यावेळी अध्यक्ष दिलावर कोंडकरी उपाध्यक्ष शकील गवाणकर, रुग्ण वाहीका प्रमुख आझीम फकीर,युवा अध्यक्ष हर्षल कुलकर्णी, रुग्ण वाहिका संघटनेचे अध्यक्ष तनवीर जमादार, एनजीओ चे जिल्हा संघटक जमीर खलफे,सभासद उपस्थित होते