मुंबई ते वरवडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन्ही बोट मालकांवर गुन्हा दाखल.

रत्नागिरी:-
राज्यात आणि जिल्ह्यात बंदी आदेश लागू असतानाही मुंबईतून दोन बोटीमधून प्रवाशांची वरवडे तिवरी बंदर पर्यंत वाहतूक करणाऱ्या दोन बोट मालकांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या भारत देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणु या रोगाचे साथ चालु असुन सदर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणुन जिल्हाधिकारी यांच्याकडून ३१ मार्च पर्यंत बंदि आदेश लागु करण्यात आला आहे. या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.
असे असतानाही माता रुक्मीणी बोटिचे मालक विष्णु विठ्ठल पवार (वय ५८ , रा . वरवडे खारवीवाडा, रत्नागिरी) व तांडेल प्रविण कृष्णा सुर्वे (वय ४३ . रा . वरवडे खारवीवाडा, रत्नागिरी) तसेच माता वैशाली बोटीचा मालक विघ्नेश नंदकुमार कोळी ( वय ३६ , रा . करंजा नवापाडा ता . उरण जि . रायगड ) व तांडेल साईनाथ मारुती भाटकर (वय ३६ , रा . कारुळभाटी ता . गुहागर जि . रत्नागिरी ) यांनी बोटीमधुन मोसमारी करणाऱ्या लोकांना मुंबई ते करंजा रायगड येथुन तिवरी बंदर वरवडे रत्नागिरी येथे समुद्र मार्गे विनापरवाना बेकायदेशीर कोरेना विषाणुचा फैलाव असताना त्यांच्या जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना विषाणुचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली घातकी व हयगईचे कृत्याद्वारे आणुन सोडले तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण रत्नागिरी यांच्या बंदी आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.