रत्नागिरी:- जिल्हयात गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही.संस्थात्मक क्वारंटाईन खाली एकूण 19 जण असून यातील 11 जण सिव्हील हॉस्पीटल, 4 कळबणी, दापोली येथे 2, कामथे 1 आणि गुहागर येथे 1 संशयित आहे. जिल्हयात होम क्वारंटाईन खाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 674 इतकी स्थिर आहे.जिल्हयात सॅनिटायझर उपलब्धता कायम रहावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने 1400 लिटर सॅनिटायझर मागविले. त्यातील 1310 लिटर सॅनिटायझर 100मिली, 500 मिली आणि 5 लिटर या पॅकिंगच्या स्वरुपात जिल्हयातील मेडिकल रिटेलर्सना पुरविण्यात आले. याची विक्री एमआरपी प्रमाण व्हावी याच्या सूचना दिल्या आहेत व त्याची तपासणी करण्यात येत आहे. खाजगी हॉस्पीटलमध्ये ओपीडी सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विदेशातून प्रवास केलेल्या आणि मुंबई, पुणे क्षेत्रातून प्रवास करुन आलेल्या लोकांना आणि होम कॉरंटाईन मध्ये असलेल्या नागरिकांना COVID – १९ बाबत काही लक्षणे आढळून आल्यास त्यासाठी Doctor on Call सुविधा माहिती देण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (दुरध्वनी क्र. ०२३५२-२२६२४८) वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.