सोलगावात सापडला मृत बिबट्या.

राजापूर:- राजापूर तालुक्यातील सोलगाव देसाई वाडी येथे आज (गुरुवारी) सकाळी मृत बिबटया मिळून आला.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सध्या कोरोना विषाणूमुळे संचारबंदी सुरू आहे. घरातून बाहेर पडायला परवानगी नाही.अशातच गुरुवारी राजपुरातील सोलगाव देसाईवाडी येथे मृत बिबट्या आढळून आला आहे.एका झुडपाजवळ तो मृत्यू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी याची कल्पना वन विभागाला दिली.त्यांनतर पोलीस आणि वनविभागाचचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.अधिक तपास सुरू आहे.