तहसीलदारांवर ‘ इन्सीडन्ट कमांडर’ची जबाबदारी

रत्नागिरी:- तालुकास्तरावर अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी तह‍सीलदारांकडे इन्सीडन्ट कमांडरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुक्यात तत्काळ निर्णय घेता यावेत यासाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. 144 कलम लागू करण्यात आले आहे. वाहन बंदी देखील करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. अशा वेळी खासगी दवाखाने व स्टॉफ यांच्यासाठी इंधन परवानगी पास देणे, किराणा व जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानांसाठी वाहन परवाना देणे, आजारी व्यक्तीला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वाहनाची परवानगी देणे आदि कामे तहसीलदार मार्फत करण्यात येत आहेत.