खान फाउंडेशन व संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने अन्नधान्य वितरण.

रत्नागिरी:- संपूर्ण देश लॉक डाउन झाल्याने दररोज काम करून पोट भरणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.यासाठी त्यांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा रत्नागिरी शहरातील खान फाउंडेशन व संकल्प युनिक फाउंडेशन यांचे वतीने रत्नागिरी शहरातील अशा गरीब कुटुंबातील व्यक्तींना करण्यात आला.
खान फाउंडेशन रत्नागिरी ही संस्था अशा अनेक प्रकारच्या प्रसंगाला नेहमी धावत असते.गोरगरीबांना दिलासा देत असते.त्याचाच एक भाग म्हणून एजाज खान यांचे नेतृत्त्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सुमारे 200 गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.यावेळी संकल्प युनिक फाउंडेशन या संस्थेने ही पुढाकार घेत सहकार्य केले.संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर आदि उपस्थित होते.खान फाउंडेशन चे इम्तियाज खान,जैद खान,फुजेल खान,फैजान खान समवेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते.