कोकण रेल्वेने प्रवास करणारे ते “तीन प्रवासी” कोकण नगर येथील.

होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय

रत्नागिरी:-
सीएसटी-मंगळुरू या गाडीने प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांचा शोध अखेर प्रशासनाला यश आले आहे. हे तिन्ही प्रवासी कोकण नगर येथील असून या तिघांनाही होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या तीन प्रवाशांच्या बोगीत एक कोरोनाग्रस्त रुग्ण बसलेला होता. या रुग्णामुळे तीन प्रवाशांनाही संसर्ग झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. यामुळेच त्यांच्या शोधासाठी ही धावपळ सुरू झाली. अखेर हे तिघे प्रवासी कोकण नगर येथील असल्याचे समोर आले. हे तिन्ही जण कामानिमित्त कर्नाटक येथे गेले होते. काम आटपून 18 ला ते रेल्वे ने प्रवास करून रत्नागिरीत दाखल झाले होते.
प्रशासनाने या तिघांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. या तिघांना त्यांच्या घरामध्येच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.