रत्नागिरी जिल्हयात अवकाळी पाऊस.

83

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हयातील काही भागात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाला सुरुवात झाली.सायंकाळ नंतर जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदलले. ढगांच्या गडगडांसह व विजांच्या कडकडांसह पाऊस पडायला लागला. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची हजेरी लागली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. आधीच कोरोना या रोगामुळे चिंतेत असलेल्या नागरिकांमध्ये अजुन भितीचे सावट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर आंबा व्यापारीसुद्धा मोठ्या चिंतेत आहेत.