गुढीपाडव्याला गजबजलेला परिसर आज मात्र सुनासुना

78

रत्नागिरी:- साडेतीन मुहर्तापैक्की एक म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी मराठी नव वर्षाची सुरवात होते. या दिवशी दरवर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. आज मात्र हे नेहमी गजबजलेले असणारे परिसर सुनेसुने आहेत.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मध्यरात्रीपासून देशभर त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. दरम्यान अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांना रत्नागिरी पोलिसांनी दंडाबरोबर लाठीप्रसादही दिला होता. त्यामुळे आज काहीजण फक्त अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडत होते. त्यात आज गुढीपाडवा.. मात्र लॉकडाऊन असल्याने सकाळी तरी लोकांनी घरी बसणे पसंत केल्याचं दिसत होतं.. त्यामुळे दरवर्षी पाडव्याला गजबजलेले असणारे परिसर आज मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांची तुरळक गर्दी वगळता सुनेसुने होते.