रत्नागिरी जिल्ह्यातील गावखेड्यात असणारे खासगी दवाखाने बंद नकोत,सुरक्षिततेची काळजी घेऊन दवाखाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या:-सुहास खंडागळेसुहास खंडागळे

77

गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी

खासगी दवाखाने बंद राहिल्यास ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा नसल्याने नियमितच्या आजारांच्या वृद्ध नागरिक,लहान मुले,महिला यांना होऊ शकतो त्रास याकडे वेधले लक्ष

संगमेश्वर:- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील खासगी दवाखाने बंद आहेत मात्र याचा फटका गावखेड्यातील दुर्धर आजार असणारे वृद्ध नागरिक,लहान मुले,महिला यांना नियमितच्या आजारांसाठी बसणार असून ग्रामीण भागात खासगी दवाखाने सुरक्षिततेच्या उपाययोजना करून सुरू ठेवावेत अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण ,दुर्गम भागात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरना वैद्यकीय सेवा देण्याची परवानगी द्यावी,ग्रामीण भागातील खासगी दवाखाने बंद नको ही विनंती सुहास खंडागळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपण, सरकार व रत्नागिरी जिल्हा प्रशासन खरच कौतुक करण्याजोगे काम करत आहात याबाबत आम्ही नागरिक म्हणून प्रशासन अधिकारी,पोलीस व सरकार यांचे धन्यवाद मानतो!
मात्र कोरोना च्या निमित्ताने कोकण सारख्या दुर्गम भागात निर्माण झालेल्या आणखी एका आरोग्य विषयक समस्येकडे आपले लक्ष वेधत आहोत असे खंडागळे यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर कडून कोरोना च्या पार्श्वभूमीवर मेडिकल सेवा /दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत.संगमेश्वर तालुक्यात देखील ही स्थिती आहे.गाव खेड्यातील दवाखाने बंद आहेत.याचा फटका ग्रामीण भागातील अन्य आजारांनी ग्रस्त वृद्ध नागरिक,महिला,लहान मुले,शेतकरी वर्ग यांना बसणार आहे.

ग्रामीण भागात डॉक्टर पूर्ण क्षमतेने कार्यरत असतानाही सरकारी रुग्णालय वर ताण येत होता.त्यात आता कोरोना चे संकट आल्याने आधीच सरकारी रुग्णालय व डॉक्टर यांच्यावर प्रचंड ताण आहे.सर्व सामान्य आजारांसाठी नागरिकांना त्यांच्या भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

ग्रामीण भागात असणारे वृद्ध नागरिक यांचे आजार,लहान मुलांचे आजार,ब्लड प्रेशर तपासणी,सांधे दुखी सारखे आजार,तीव्र स्वरूपाची पोटदुखी,हगवण किंवा किरकोळ जखमा ना केले जाणारे बँडेज,कावीळ,मुतखडा,टायफॉईड, मलेरिया, व कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार यावर वेळेत उपचार मिळणे ग्रामीण भागातील जनतेला गरजेचे असून कोरोना साथ सुरू आहे म्हणून वरील नेहमीचे आजार थांबणार नाहीत .या स्थितीत ग्रामीण भागातील दवाखाने बंद राहिल्यास सरकारी रुग्णालयावर अधिक ताण येणार आहे,शिवाय गाव खेड्यातील वृद्ध नागरिकांना नियमित चेक अप साठी तालुक्यातील सरकारी रुग्णालयात येणे शक्य नाही,गाव खेड्यात मेडिकल दुकान देखील नसतात परिणामी रुग्णांना डॉक्टर च औषध देत असतात. त्यात बस सेवा ही बंद आहेत याकडे सुहास खंडागळे यांनी लक्ष वेधले आहे.

एकंदरीत स्थिती लक्षात घेऊन काही नियम ठरवून व डॉक्टर ना योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करून… ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरना या अडचणीच्या काळात सेवा बजवण्यास सांगावे अशी विनंती खंडागळे यांनी केली आहे.ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर ना सेवा देण्यास परवानगी नाकारली गेली असल्यास किंवा डॉक्टर च्या स्तरावर हा निर्णय झाला असल्यास सरकारी रुग्णालय वर कामाचा ताण येण्याची शक्यता असून ग्रामीण नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आज कोरोना लढाई खऱ्या अर्थाने प्रशासन,शासन आणि डॉक्टर लढत आहेत अशा स्थितीत मोठ्या संख्येने असणाऱ्या ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर नी सेवा बंद ठेवल्यास त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे.

शहरी भागात हॉस्पिटल आहेत मात्र ग्रामीण भाग हा गावात असणाऱ्या खासगी दवाखान्यांवर अवलंबून आहे.शहरी भाग वगळून ग्रामीण भागातील डॉक्टर ना दवाखाने सुरक्षिततेच्या दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील का?याचा आपण विचार करावा अशी विनंती सुहास खंडागळे यांनी केली आहे.गाव खेड्यात असणारे खासगी दवाखाने आणखी काही दिवस बंदच राहणार असतील तर प्रत्येक पंचक्रोशी मध्ये एक सरकारने तात्पुरती नियुक्ती केलेला डॉक्टर किंवा शासकीय अनुमती असणारा खासगी डॉक्टर यांची ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी नियुक्ती करण्यात यावी अथवा फिरत्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी व विनंती सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.आपण या मागणीचा विचार करावा ,आरोग्य विभागाच्या लक्षात ही बाब आणून द्यावी असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.