कोंडमळा येथे दोन चारचाकीच्या अपघातात 1 ठार;7 जखमी

134

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडमळा येथे हॉटेल रसोईसमोर बलेनो व ब्रिझा या दोन गाड्यांमध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात बलेनो गाडीतील जगदीश बाळकृष्ण मसुरकर या ६१ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही गाडीतील सातजण जखमी झाले आहेत. या जखमींना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याप्रकरणी ब्रिझा गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.