दाभोळ ते वाटुळ 23 किलोमीटर रस्त्याचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न

147

दाभोळ ते वाटुळ या 23 किलोमीटर रस्स्त्याचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
लांजा तालुक्यातील दाभोळे शिपोशी कोर्ले या आशियाई विकास बँक सहाय्यीत प्रकल्प महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पाअंतर्गत लांजा तालुक्यातील कोर्ले गावी भूमिपूजन आमदार राजन साळवी, जगदीश राजापकर, चंद्रकांत मंचेकर ,युवराज हांदे ,युवासेना धनंजय गांधी, विनय गांगण, रवींद्र डोळस,तात्या साळुंखे,राजू गांधी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पाअंतर्गत 82 कोटीचा निधी देण्यात आला आहे. पूर्व भागातील ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.या रस्त्याचा मोठा फायदा पूर्व भागांतील 20 गावांना होणार आहे.कोल्हापूर ते गोवा जोडणारा रस्ता असल्याने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे.माचाळ पर्यटन व खोरणींनको धबधबा या ठिकाणाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे
दाभोळ ते वाटुळ या रस्त्याचे मुख्य वैशिष्ट्य मध्ये 23 किलोमीटर डांबरीकरण करणे.77 मोर्‍या बांधणे,दोन मोठे जंगशन बांधणे,आठ लहान मोठे पुलाची पुनरबांधणी,रस्त्यावर लाईट लावणे,झाडे लावणे,तेरा बस थांबे ,पूर्ण रस्त्याची लांबी व धावपट्टी रुंदी पाच मीटर असून पाच वर्षे रस्त्याची देखभाल करणे व कोर्ले भांबेड वाघणगाव गावातील कॉक्रिट रस्ता बनविन्यात येणार आहे. हे काम एस .एस .अलूर कंन्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आले आहे .