माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गुरव यांचा फेर निवड.

रत्नागिरी जिल्हा बीएड धारक माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी देवरुख न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक संजय चंद्रकांत गुरव यांची फेर निवड करण्यात आली आहे.
देवरूखीत पार पडलेल्या माध्यमिक संघाच्या कार्यकारिणी निवड बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी गेली दोन वर्षे संघाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळल्याबद्दल संघटनेच्या सभासदांनी सर्वानुमते गुरव यांची फेरनिवड केली.
यावेळी संघाची नूतन कार्यकारिणी देखील तयार करण्यात आली. यात उपाध्यक्ष म्हणून इलाही मुलाणी (माने विद्यालय, भांबेड),सुनिल देशमाने (कान्हेरे विद्यालय आयनी) यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून शिवाजी बणगर (सोनावडे हायस्कूल), कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे (पटर्वधन हायस्कूल रत्नागिरी) यांची वर्णी लावण्यात आली आहे.
महिला आघाडी प्रमुख म्हणून सिध्दी लांजेकर( सैतवडे हायस्कूल), सदस्य म्हणून विजयकुमार गुरव (बुरंबी), अल्मिन शेख (फुरुस), प्रकाश पाटील (कुटरे), अरुण कुराडे (कोंडे), मारुती चौगुले (कसोप), धनाजी गिरी ( आबलोली), योगेश शेट्ये (हरचिरी) यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व नूतन पदाधिकारी यांचे संघटनेच्यावतीने अभिनंदन करणेत येवू त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे काम करताना सदस्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यावर भर देणार असून शासनस्तरावरील मागण्यांसाठी राज्य संघटनेशी पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे .गुरव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले