देवरुख काॅलेजच्या मैदानावरुन सुखोई मिराज करणार उड्डाण १ फेब्रुवारीला एरोमाॅडेलींग शो.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पिञे महाविद्यालयाच्या मैदानात १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत इलेक्र्टिक मोटरवर उडणार्‍या विविध प्रकारच्या रेडीओ कंट्रोल विमानांची प्रात्यक्षिके मुलांना विनामुल्य पाहता येणार आहेत. देवरुख स्नेह परीवार व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचा हा उपक्रम आहे.
फ्लाईंग ईगल, ग्लायडर, उडता मासा, उडती तबकडी, ट्रेनर विमानांचे प्रात्यक्षिक पहायला मिळणार आहे. या बरोबरच भारतीय वायुसेनेतील मिराज-३०००,सुखोई-३०,व राफेल या लढाउ विमानांच्या रोमहर्षक कसरतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
प्रसिद्घ विमान छांदिष्ट सदानंद काळे यांचा हा शो आहे.अथर्व काळे हे विमाने उडवणार आहेत तर अक्षय काळे तांञिक बाजु सांभाळणार आहेत.
नुकतेच बालाकोटला भारताने एअर स्ट्राईक करुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले त्यात प्रमुख कामगिरी करणारे मिराज विमान,भारतीय वायुसेनेत नुकतेच दाखल झालेले राफेल व भारताच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक सुखोई-३० यांचे या एरोमाॅडेलिंग शो चे खास आकर्षण ठरणार आहे.या शोमधुन मुलांना विमानांची कार्यप्रणाली अभ्यासता येणार आहे.
भविष्यात हा शो पहाणारा विद्यार्थी पायलटही बनु शकतो असे या शोचे वैशिष्ट्य आहे.या शो साठी रुबीना चव्हाण,रेवा कदम ,युयुत्सु आर्ते,प्रमोद हर्डीकर,सुरेश गोखले,स्मिता गोखले,सदानंद भागवत सहकार्य करत आहेत.
या शो नंतर स्वतः प्रयोग करुन विमान छंद सुरु करण्यासाठी तीन आकर्षक उडणार्‍या विमानांचा संच ५०० रुपयात उपलब्ध करुन दिला जाणार आहे.