जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचीत महिला व बालकल्याण सभापती सौ रजनीताई चिंगळे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी यांच्या पाठीवर पक्षप्रमुखांनी कौतुकाची थाप मारत दिलेली जबाबदारी चोख बजावत सर्व सामान्य महिलांना न्याय देण्याच काम करा असे सांगितले
या भेटीच्या वेळा त्यांचे सोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते सुभाष बने यांचे सुपुत्र जिपचे अध्यक्ष रोहन बने सहसंर्पक प्रमूख राजू महाडीक जिल्हा प्रमुख विलास चाळके आदि मान्यवर उपस्थित होते
सौ.रजनीताई या संगमेश्‍वर तालुक्यातील दाभोळ जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधीत्व करतात. यावेळी सभापतीपदासाठी त्यांना संधी देण्यात आली. त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. जि. प. सभापतीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच सौ रजनीताई यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

उध्दव ठाकरे यांनी रजनीताईंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत अशी आपल्या सारखी नविन पिढी शिवसेनेच्या रूपाने राजकारणात येत आहे ही कौतुकास्पद गोष्ट असून मिळालेल्या कालावधीचा सदुपयोग करून जिल्ह्यात आपल्या कामाची छाप पाड असा सल्ला दिला. लागेल त्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून आपण सदैव पाठीशी राहू अशी ग्वाहीही त्यांनी सौ चिंगळेंना दिली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांचे आभार मानत शिवसेना या चार अक्षरांमुळेच आपल्यासारखी सामान्य महिला जिल्हा परिषदेत सभापती होऊ शकलीअसे सांगत वर्षभराच्या कालावधीत आपण जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्ह्यातील महिलांना स्वताच्या पायावर उभे करतानाच त्यांना सन्मानपण मिळविणेसाठी बदल घडवून महिला सक्षिमाकरणावर भर देवू असे सांगितले.
…………………