गाव विकास समितीने दूर केली जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय.

जमिनीच्या_ओलाव्यामुळे विद्यार्थ्यांची होत होती गैरसोय,समस्या लक्षात घेऊन गाव विकास समितीकडून तातडीने 10 बेंच देऊन मदतीचा हात.

गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या पुढाकाराने पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या जमीन ओळव्यापासून ,संभाव्य आजारांपासून सुरक्षा मिळाली असून गाव विकास समितीने या मराठी शाळेला दहा बेंच भेट देऊन मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.याबाबत गावातील नागरिकांनी संघटनेचे आभार मानले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी शाळा 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्ग खोल्यांच्या जमिनीला ओलावा मारत असल्याने वर्गात बसणाऱ्या मुलांची गैरसोय व ओळव्यामुळे पावसाळ्यात आजारी पडणारी मुले याबाबत पालक वर्गाने गाव विकास समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता.शाळेने देखील बेंच ची मागणी केली होती.नंतर गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे,राहुल यादव यांच्या सूचनेनुसार स्थानिक पदाधिकारी डॉ. मंगेश कांगणे,अमित गमरे,दिक्षा खंडागळे, अनघा कांगणे,मनोज घुग,प्रशांत घुग यांनी पांगरी येथील प्राथमिक शाळायेथे भेट देऊन समस्या समजून घेतली व येथील विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास होणारी गैरसोय लक्षात घेतली. संघटनेच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत सदर शाळेला आवश्यक असणाऱ्या 10 बेंच देण्याचा निर्णय घेण्यात आला व 22 डिसेंम्बर रोजी गाव विकास समितीचे पदाधिकारी यांनी स्वतः जाऊन पांगरी येथील मराठी शाळेस दहा बेंच मदत म्हणून भेट दिल्या.गाव विकास समिती या तरुणांच्या संघटनेने केलेल्या या कार्याबाबत पांगरी वासीयांनी 24 डिसेंबर रोजी पार पडलेल्या शाळा शताब्दी उत्सवात गाव विकास समिती च्या संघटनेचे आभार मानले व यथोचित सन्मान केला.जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारावा या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी भूमिका गाव विकास समितीचे देवरुख शहर अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे यांनी यावेळी व्यक्त केली.संघटनेच्या महिला संघटना अध्यक्ष सौ दिक्षा खंडागळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्याकरिता नियोजन बद्ध धोरण शासनाने तयार करणे आवश्यक आहे असे म्हटले.यावेळी गाव विकास समितीचे पदाधिकारी संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष अमित गमरे ,देवरुख शहर अध्यक्ष डॉ मंगेश कांगणे,महिला अध्यक्षा दिक्षा खंडागळे, उपाध्यक्षा अनघा कांगणे, जिल्हा संघटक मनोज घुग आदीसह शिक्षक व पालक उपस्थित होते. गाव विकास समितीच्या अनघा कांगणे व राजेश कांगणे यांचे विशेष सहकार्य गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा ही तरुणांची संघटना स्वतः सहकारातून समाजातील अनेक गरजूंना सहकार्य करत असते,संघटना कुणाकडून ही देणगी न घेता संघटनेचे पदाधिकारी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या उत्पन्नतील रक्कम बाजूला करून संघटना म्हणून हे उपक्रम राबवत असते.अनेक लोकोपयोगी आंदोलन, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या संघटनेने पांगरी मराठी शाळेला नुकतीच 25 हजार किमतीची बसण्याची 10 बाके दिली.या लोकोपयोगी उपक्रमास गाव विकास समितीच्या महिला उपाध्यक्ष सौ अनघा कांगणे व त्यांचे पती राजेश कांगणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.गाव विकास समितीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील तरुण,तरुणी महिला सामाजिक परिवर्तन करण्यासाठी सढळ हस्ते मदत करण्यास पुढे येत आहेत ही आशादायक गोष्ट असल्याचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी म्हटले असून आता ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने सजक होईल असे त्यांनी म्हटले आहे.