अभाविप चा युवक सप्ताह उत्साहात संपन्न

१२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवा शक्तिमध्ये जागृती व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून रत्नागिरी शहरात युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.१२ जानेवारी ते ३० जानेवारी या काळात अभाविप चा युवक सप्ताह यशस्वी सम्पन्न झाला.रत्नागिरी शहरातील सर्व वसतिगृह आणि महाविद्यालयापर्यंत सम्पर्क करत व्यक्तिमत्त्व विकास,कौशल्यधिष्ठित शिक्षण, मिशन 2020,स्वामी विवेकानंद आणि भविष्यातील भारत,प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सुमारे २००० पेक्षा जास्त विद्यार्थी या काळात युवक सप्ताहात सहभागी झाले होते.अभाविप चा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त प्रेरणादायी होता आणि मोठा प्रतिसाद या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दिला असे रत्नागिरी शहरमंत्री हृषीकेश वैद्य याने सांगितले.स्वरूप काणे याने यांनी युवक सप्ताह प्रमुख अशी जबाबदारी घेत जिल्ह्यात तर ईशान पाळेकर याने शहरात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केले.