आणखी आठजण कोरोना बाधित; रुग्णसंख्या 183 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. संध्याकाळी 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर आताच आणखी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आठ जणांपैकी रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर येथील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संंख्या 183 वर पोहोचली आहे.

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील 6 आणि संगमेश्वर येथील दोन असे 8 अहवाल प्राप्‍त झाले आहेत हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात एकूण 22 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 183 इतकी झाली आहे. रत्नागिरीत सापडलेल्या सहा पॉझिटीव्ह रुग्णांपैकी चार रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्ण संख्येने जिल्हावासीय धास्तावले असून जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या द्विशतकानजिक पोहोचली आहे.