रत्नागिरी:- 108 ची रुग्णवाहिका न पोचल्याने 6 पॉझिटिव्ह रुग्ण कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर दिवसभर ताटकळत उभे आहेत. 6 जणांना कोरोनाची लक्षणे नसल्याची माहिती समोर आली आहे. दिवसभर रुग्णवाहिकेची वाट पाहिल्यानंतर 6 रुग्ण पुन्हा घरी जाण्याच्या तयारीत आहेत.
वाढत्या कोरोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडल्याचे दिसत आहे. अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर व साधनसामग्रीवर आरोग्य कर्मचारी मागील वर्षांपासून कोरोना विरुद्ध नेटाने लढाई लढत आहेत. मात्र आज अपुऱ्या सुविधेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोतवडे प्राथमिक केंद्राबाहेर आज सकाळी 10 वाजल्यापासून 6 पॉझिटिव्ह रुग्णांना ताटकळत ठेवण्यात आले आहे. अद्यापही त्यांना रत्नागिरीत आणण्यासाठी रुग्णवाहिका पोहचली नसल्याने आता हे रुग्ण कंटाळून घरी जायच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.