होळी आणण्यासाठी जाताना वृध्दाचा मृत्यू

रत्नागिरी:- होळी आणण्यासाठी ट्रक मधून नेवरे येथे जात असताना साखरतर येथे भोवळ आलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला . याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शामराव काजवे ( ५६ , रा . अथर्व कॉम्प्लेक्स पऱ्याची आळी , रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे . शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होळी आणण्यासाठी ते इतर ३० जणांसह ट्रक मधून पऱ्याची आळी ते नेवरे असे जात होते . सायंकाळी ४.३० वाजता साखरतर येथे विजय काजवे यांना भोवळ आल्याने ते ट्रकच्या हौद्यात खाली बसले . ट्रकमधील इतर सहकाऱ्यांनी त्यांना कासारवेली येथील डॉक्टरकडे नेले असता त्याने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले . सायंकाळी ६ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काजवे यांना तपासून मृत घोषित केले.