रत्नागिरी:- दार उघड वहिनी… म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली १८ वर्ष सन्मान करत आला आहे. आता होम मिनिस्टरच महामिनिस्टर हे नवीन पर्व ११ एप्रिल पासून सुरु झाले आहे. रविवारी रत्नागिरी शहरातील वि.दा. सावरकर नाट्यगृहात होम मिनिस्टरचा कोकण विभागाचा कार्यक्रम झाला.यातून ९० महिलांची निवड करण्यात येणार आहे.मात्र होम मिनिस्टर कार्यक्रमाने घराघरातील संवाद वाढविला आहे. कुटुंबातील न बोलणारी नातीही बोलकी झाली आहेत. याचा मला सर्वाधिक आनंद असल्याची प्रतिक्रिया लाकडे भाऊजी आदेश बांदेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या १८ वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्ये देखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आहे. यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ सुरु आहे. ११ लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस प्रेक्षकांना पाहायला मिUेत आहे. प्रत्येक विभागात महिलांचा चांगला प्रतिसाद मिUत असल्याचे श्री. बांदेकर यांनी सांगितले.
या पैठणीला सोन्याची जरी असेल पण हि ११ लाखांची पैठणी कशी असेल हि पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे. गेली १८ वर्षे सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज एका पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारांपेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या. ११ लाखांची पैठणी ही येवल्यात बनतेय. जे ही पैठणी विणत आहेत, त्या विणकर कुटुंबातील दाम्पत्याला नीट बोलता येत नाही. त्यांना ऐकूही येत नाही. अशा विणकरांना जी मजुरी मिळणार आहे, ती त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे याचा आनंद जास्त मोठा आहे. त्यामुळे पैठणीची किंमत ११ लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिUतोय. हा चांगला उद्देश आहे. या पैठणीपेक्षा कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा असल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले.