रत्नागिरी:- शहरातील सुप्रसिद्ध ‘हेळेकर मिठाई’चे मालक,तरुण व्यावसायिक योगेंद्र राजन हेळेकर यांचे वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहरासह मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
जुना माळ नाका येथे योगेंद्र हेळेकर यांचे ‘हेळेकर मिठाई’ या नावाने प्रसिद्ध दुकान होते. मिठाई व्यवसायाबरोबरच योगेंद्र हेळेकर एक उत्तम चित्रकार म्हणूनही ओळखले जात होते. आपल्या या कौशल्याने ते अतिशय देखण्या आणि आकर्षक गणपतीच्या मूर्ती साकारत असत. त्यांचा हसतमुख स्वभाव, शांत आणि नम्र व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. योगेंद्र हेळेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता भागोजी शेठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे रत्नागिरी शहराने एक उमदा व्यावसायिक आणि हरहुन्नरी कलावंत गमावला आहे.