रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र अनेकजण नियम पायदळी तुडवून विनामास्क फिरतात. अशा लोकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. कारवाईचा भाग म्हणून या लोकांना मास्क वाटप करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा भाग म्हणून अशा नागरिकांची नावे नोंदवून मास्क वाटप करण्यात आले व मास्क न वापरल्याने होणाऱ्या संक्रमाना बद्दल समजावण्यात आले. विना मास्क फिरणाऱ्या लोकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. पोलिसांच्या अनोख्या कारवाईने नागरिक देखील बुचकळ्यात पडले.
नागरिकांनी कृपया बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाताना स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.