राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर हातिवले गोवळफाटा येथे भरधाव कारने पादचाऱ्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात जयवंत तुकाराम बगाडे (वय ५०, रा. बारसू) या इसमाचा मृत्यु झाला आहे.रविवारी सायंकाळी ०६.२५ वा. चे दरम्याने हा अपघात घडला. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी कार चालक दर्शन शशिकांत आळवे, (वय-२९, रा. कुडाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी जावेद कमल काझी (वय ५० वर्षे, रा. बागकाझी मोहल्ला राजापूर) यांनी राजापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
यातील आरोपी याने त्याचे ताब्यातील पांढ-या रंगाची स्कोडा स्लेव्हिया गाडी (टेम्पररी पासिंग नंबर T1024GA 5750 आ) भरधाव वेगाने, हयगयीने, बेकरदारपणे व रस्त्यांचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालवून मयत जयवंत तुकाराम बगाडे यांना जोराची ठोकर मारून त्यांचे डोक्यास, पोटास, चेहऱ्यास, छोटया मोठया दुखापती करून मरणास कारणीभूत झाला म्हणुन त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम. १०६(१), २८१,१२५ (अ), १२५ (ब) मोवाकाक १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक तपास राजापूर पोलीस करीत आहेत.