रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा शाळेजवळ सोमवारी सकाळी पुन्हा गॅस वाहू टँकरचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4 दिवसात पुन्हा गॅस टँकरचा अपघात झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने गॅस टँकर चालला होता. हातखंबा येथील शाळेजवळ आला असता उतार आणि नागमोडी वळणे यामुळे चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी चालकाचा गाडीवर ताबा सुटला आणि टँकर थेट वडापावच्या टपरीत घुसला. सुदैवाने चालकाने उडी मारल्याने बचावला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. टँकरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघाता नंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा टॅबचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हातखंबा येथील ग्रामस्थ ही अपघातानंतर मदतीसाठी धावले.