रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा-शाळेजवळील रस्त्यावर गॅस टॅन्कर पलटी झाल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद खाजा पाशा (वय ५०, रा. अफजल सागर मलापल्ली, नामपल्ली महीदीपठणम सरोजिनी हॉस्पीटल, हैद्राबाद) असे संशयित टॅन्कर चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) रात्री अकराच्या सुमारास हातखंबा येथील वळणावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सय्यद पाशा हे टॅन्कर (क्र. एपी-३९ टीएफ ०१५७) घेऊन जयगड ते कोल्हापूर अशी घेऊन जात असताना हातखंबा गावाच्या वळणावर निष्काळजीपणे टॅन्कर चालवून टॅन्कर पलटी झाला. या अपघातामध्ये चालकाला दुखापत झाली. तसेच वाहनाचे नुकसान झाले. गॅस गळती झाली. या प्रकरणी पोलिस पाटील औकीत सखाराम तारवे (वय ३२, रा. तारवेवाडी-हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.