हातखंबा येथे अवघड वळणावर ट्रकची दोन गाड्यांना धडक

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अवघड वळणावर ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली. ही घटना बुधवा 5 जुलै रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, मात्र तिन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने ट्रकचालक नंदकिशोर (वय ५०, राहणार फोंडा – गोवा ) हा आपल्या ताब्यातील ट्रक (गाडी क्रमांक RJ 14 GH 5321) घेऊन जात होता. हातखंबा अवघड वळणावर येताच गॅस वाहतूक करणाऱ्या मागून धडक देत समोरुन येणाऱ्या एसटी (गाडी क्रमांक MH AP 5723) बसला ही धडक दिली. यामध्ये गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले.