हातखंबा येथील दुचाकी अपघात प्रकरणी प्रौढावर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दुचाकीच्या अपघातात जखमी झाल्याप्रकरणी प्रौढावर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद दत्ताराम चव्हाण (53, मांडवी, सदानंदवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास घडली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलींद चव्हाण हे निवळी येथून हातखंबा दरम्यान स्वतः च्या दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी ईश्वर धाबा येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत झाली. अपघातात स्वत:च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्यापकरणी मिलींद चव्हाण यांच्यावर भादविकलम 279, 337 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाजे करत आहेत.