रत्नागिरी:- हातखंबा येथील ढाब्यावर सफाईचे काम करणारा प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला खासगी व अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर बारक्या झोरे (वय ४०, रा. हातखंबा, ईश्वर ढाबा, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) रात्री आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर झोरे हे ढाब्यामध्ये सफाई कामगार म्हणून कामाला होते. ते तेथील रुममध्ये आराम करत होते. दुपारी जेवणासाठी आले नाहीत म्हणून तेथील एका कामगाराने रुममध्ये जाऊन पाहिले असता त्यांची हालचाल होत नव्हती. तात्काळ त्याला खासगी दवाखान्यात नेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.