रत्नागिरी:- कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता हातखंबा पंचायत समिती हातखंबा गणात पंचायत समिती सदस्य सौ साक्षी संतोष रावणंग यांनी अठराशे मास्क, ऑक्सी मीटरचे वाटप केले.
ना. उदय सामंत,उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप व शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या उर्फ प्रदिप साळवी यांच्या मार्गदर्शननुसार पंचायत समितीच्या निवळी,हातखंबा,वेळवंड, कापडगाव,चरवेली गावात आठरशे मास्क व ऑस्की मीटरचे वाटप त्या गावातील वाडी प्रमुख, गावप्रमुख,शाखा प्रमुख, सरपंच,उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
याचबरोबर आपला जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक-मालक यांनाही मास्क वाटप करण्यात आले. तर रात्रंदिवस जनतेची सेवा करणारे आशा सेविका,आरोग्य सेविका,पोलीस पाटील यांचा कोरोना योध्दा सेवा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.
जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून हे मास्क व ऑक्सी मीटरचे वाटप करण्यात आल्याचे पंचायत समिती सदस्य सौ साक्षी रावणंग यांनी सांगितले.