रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा तिठा येथे दुचाकीच्या अपघातात विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तैसिरा अमीन हिसब (वय २६,रा. मुंबई, सध्या वडवली, ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) दुपारी पावणे तीनच्या सुमारास हातखंबा तिठा येथील अंलकार हॉटेलच्या समोरिल रस्त्यावर झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमीन हिसब हा मुंबईला रहातो. दोन ते तीन वर्षापुर्वी या दोघांचा विवाह झाला होता. अमीन काही दिवसापूर्वी मुंबईहून वडवली (ता. लांजा) येथे गावाला आला होता. रविवारी पत्नी तैसिरा हिच्यासह दुचाकीवरुन लांजाहून रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा तिठा येथील रस्त्यावर आला असता त्यांच्या दुचाकीच्यामागून एक ट्रक जात होता. ट्रक दुचाकीच्या जवळ घेतल्याने स्वाराचा कॉक्रीटरस्त्याच्या कामामुळे दुचाकीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. दोघेही दुचाकीवरुन पडली. त्यावेळी अमीन उठेपर्यंत मागून येणारा ट्रक पत्नीच्या हातावरुन गेला. त्यात ती गंभीर जखमी झाली निपचित पडली. अमीन हा देखील जखमी झाला. तैसिरा व अमीन यांना तेथील ग्रामस्थांनी तात्काळ रिक्षा टेम्पोने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तैसिराचा जागीच मृत्यू झाला होता.
या अपघाताची ग्रामीण पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिस घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले. पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.