हातखंबा-झरेवाडीतील बेपत्ता महिलेचा सापडला सांगाडा

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-झरेवाडी येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा सांगाडा पेठे पठाराच्या खालच्या बाजुला झरेवाडी पठारावर मिळून आला.

पुनम महादेव कोत्रे (38, रा.कापडगाव कोत्रेवाडी,रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पुनम कोत्रे ही महिला वेड्याच्या भरात घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेली होती. याबाबत तिच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. तिचा शोध तपास सुरु असताना मंगळवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10.15 वा.सुमारास पेजे पठाराच्या खालच्या बाजुला झरेवाडी पठारावर एक मानवी सांगाडा मिळून आला. अंगावरील कपड्यांवरुन ती पुनम कोत्रे असल्याची खात्री पटली आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.