हातखंबा अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रविवारी दुपारी हातखंबा बाजारपेठेत बेदरकारपणे ट्रक चालवून पुढील चार वाहनांना धडक देत अपघात केला. यात एकाच्या मृत्यूस तसेच 6 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी  रात्री  1 वा.सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

अजीजउल्ला  आश असमोहम्मद (37,रा.उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ट्रक चालकाचे नाव आहे.या अपघातात सतीष कोंडीबा  डांगरे(45,रा.गणेशनगर इचलकरंजी,कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्याच कुटुंबातील 5 जण आणि कासारवेली येथील एक वृध्द असे एकूण सहाजण जखमी झाले होते.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.