रत्नागिरी:- हभप शरददादा बोरकर प्रतिष्ठानच्या वतीने जयगड परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. पुढील काळात या प्रतिष्ठानकडून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर प्रथमच विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला. यावेळी जयगड परिसरातील कळझोनडी, केंद्र, वाटद केंद्र, जांभारी केंद्र, संडखोल केंद्र या चार केंद्रामधील सर्व शाळांमधील विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात आले. वह्या वाटप कार्यक्रमसाठी प्रतिष्ठानच्यावतीने श्री. समीर बोरकर, निखिल बोरकर, डॉ. कांबळे, शशांक बोरकर, सुयोग बोरकर, संदेश महाकाळ, शेखर भडसावळे, रवी बोरकर, माधव अंकलगे सर, अरुण मोरे, निकेतन बोरकर, निनाद चव्हाण, स्वरूपा गजने, सई बोरकर, श्री शितप, केंद्र प्रमुख सौ मांजरेकर मॅडम, आणि श्री पवार सर उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांनी शरददादांसोबतचे आपले अनुभव आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिष्ठानच्यावतीने निखिल बोरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना लागेल ते सहकार्य करण्याचे घोषित केले. या पुढे सुद्धा असे अनेक कार्यक्रम सुरू राहतील समजपयोगी कार्यक्रम घेत राहू आणि बोरकर दादा प्रतिष्ठान नेहमी लोक कल्याण चा विचार करीत राहील असे निखिल बोरकर म्हणाले.