स्वामी माऊली बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्टने दिला “आपुलकीचा हात”

महिला रुग्णालयात ट्रस्टमार्फत मोफत भोजन  

रत्नागिरी:- सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या स्वामी माऊली बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्टने कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना आपुलकीचा हात दिला आहे. या ट्रस्ट मार्फत कोव्हीड रुग्णालयात एकवेळ मोफत भोजन ट्रस्ट मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजवला आहे. हे जागतिक संकट असून अशा संकटकाळात माणुसकीचे दर्शन फार विरळ ठिकाणी पहायला मिळते. कोकणी माणूस हा प्रेमळ माणूस म्हणून ओळखला जातो. मात्र कोरोनाच्या या महामारीत कोकणी माणसाच्या माणुसकीचे दर्शन घडत आहे.

एकीकडे आपला जीव धोक्यात घालून रत्नागिरीत आरोग्य कर्मचारी कर्मचारी काम करीत आहेत. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. त्यातच रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी देखील होऊ लागली आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्याकरिता शासनाने पुन्हा लॉकडाऊन सुरु केले असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी रत्नागिरीतील अनेक संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला आहे.

 स्वामी माऊली बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्टने देखील यात पुढाकार घेतला असून आपुलकीचा हात पुढे करून या ट्रस्टने रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी महिला रुग्णालयात मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे.या ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत पवार, सूयर्कांत शिंदे, राज पवार, श्रद्धा देवरुखकर, प्रीती पवार, संदीप रजपूत, विनोद भंडारे यांच्यासह रश्मी पडवळ, राजेश मोरे, संतोष गवाणकर, राजेंद्र पडवळ, रुचिता पांढरे, दिपक दाते, पुष्पा रेवतगाव, तौफिक लतीफ पावसकर, सिद्धेश धुळप, श्रेयस पिलणकर आदींनी यात पुढाकार घेऊन रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना मदत पोहचवण्याचे काम करीत आहेत.

या उपक्रमामुळे ट्रस्टच्या कार्याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले असून रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वामी माऊली बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व ट्रस्टींचे आभार व्यक्त केले. ज्या रुग्णांना मदतीची गरज आहे त्यांनी प्रशांत पवार ९७६३७०२६६८, व सुबहान तांबोळी ९२२६७७३३४४ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे.