स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजी यांचे निधन

रत्नागिरी:- स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेले महादेव नारायण वांदरकर यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 106 वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वी त्याचा 106 वा वाढदिवस  साजरा करण्यात आला होता. 

15 जुलै 1916 साली त्यांचा जन्म झाला होता. 1935 साली ते सातवी पास झाले. ब्रिटिशांची जुलमी राजवट त्यांनी अनुभवली होती. महात्मा गांधीजी यांच्या मिठाच्या सत्याग्रहात वांदरकर गुरुजी सहभागी झाले होते. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत लांजा ते रत्नागिरी दरम्यान पदयात्रेत त्यानी सहभाग घेतला होता. 1931 मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्ष देखील त्यांनी पाहिला होता. गाडगेबाबा यांच्या सोबत स्वच्छता मोहिमेत वांदरकर गुरुजी सहभागी झाले होते. 
गुरुजींच्या निधनाने एका शतकाचा इतिहास संपला अशी भावना रत्नागिरीतील दिग्गज व्यक्तींनी व्यक्त केली.