स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमांतर्गत पोलीस दलाकडून जप्त मुद्दे्मालाचे वाटप

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमांतर्गत जप्त मुद्दे्मालाचे वाटप करण्यात आले आहे. सायबर पोलीस ठाण्यांतर्गत हस्तगत केलेले 40 मोबाईल हॅण्डसेट मूळ मालकांना पोलिसांनी परत केले आहेत.

पल्लवी विजय ओरपे (रा. करबुडे) यांचे 1 लाख 71 हजार 220 रुपये किंमतीचे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने यावेळी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुद्देमाल परत मिळालेल्या नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरिक्षक मारुती जगताप, पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, विनीत चौधरी, शिरीष सासणे, सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पुरळकर उपस्थित होते.