रत्नागिरी:- अपघातात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर अर्जून गावडे (३१, रा. निवळी-गावडेवाडी, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना २२ ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास खेडशीनाका रस्त्यावर घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमर हा दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय ८२१२) घेऊन कुवारबा ते हातखंबा असता जात असताना खेडशी नाका येथे निष्काळजीपणे गाडी चालवून समोरील ट्रक (क्र. एमएच ४६ बीयु ४५३५) ला बाजू देते असता समोरुन येणारी रिक्षा (क्र. एमएच-०८ बीसी ०६७६) च्या उजव्या बाजूला डेऱ्यावर ठोकर दिली. यामध्ये दुचाकी रस्त्यावर पडून अपघात झाला. या अपघातात अमरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल मंदार मोहिते यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध शुक्रवारी (ता. २५) ला गुन्हा दाखल केला आहे.









